
पुणे : राहुल शेवाळेप्रकरणी फेसबुक लाईव्हद्वारे पीडितेची ओळख उघड केल्यानं राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे अडचणीत आल्या आहेत. महिला आयोगाकडून ठोंबरे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली. (Rupali Thombre in trouble Women Commission will take action Know what happened)
पीडितेचे नाव घेणं किंवा तिला कॅमेऱ्यासमोर आणून पीडितेची ओळख लोकांसमोर आणणं चुकीचं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी काल राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचं फेसबुक लाईव्ह केलं, त्यानंतर अनेक सामाजिक संघटनाकडून तक्रारी आल्या. त्यामुळं महिला आयोग विधी विभागाचा अभिप्राय मागवून पुढील कार्यवाही करणार आहे.
रुपाली ठोंबरेंचं म्हणणं काय?
माझ्या लाईव्हमध्ये पीडित महिला स्वतः लाईव्ह आली आहे आणि तिने स्वतः चेहरा दाखवला आहे. तिला न्याय मिळत नसल्यानं लाईव्ह यावं लागलं. राज्य महिला आयोग किंवा राष्ट्रीय महिला आयोगाकडून याप्रकरणी पोलिसांना पत्र गेली आहेत मग पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही. पीडित महिलेची फिर्याद तुम्ही का दाखवत नाहीत? तिच्यावर शारजाहमध्ये खोटी केस दाखल केली आहे.
हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'
माझ्या लाईव्हवर जर कोणाला तक्रार असेल तर ती केवळ त्याच पीडित महिलेला असू शकते. बाकी माझ्या विरोधात कोणी तक्रार करत असेल तर ते 'मिंधे' गटाचे असतील. पीडित महिला स्वतः जर न्याय मागण्यासाठी येत असेल तर गुन्हा दाखल होत नाही. उद्या मी विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या सर्व प्रकरणांसंदर्भात नागपूरमध्ये जाऊन कागदपत्रं सादर करणार आहे. गरज पडल्यास पीडितेस घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाईल, असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.