Rupali Thombre: रुपाली ठोंबरेंची 'कसबा'साठी फिल्डिंग; यापूर्वी मनसेनं कापलं होतं तिकीट!

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतंच निधन झालं त्यामुळं कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे.
rupali thombre patil
rupali thombre patilesakal
Updated on

Pune Kasaba Constituency : राष्ट्रवादी काँग्रेसचा पुण्यातील कणखर आवाज असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतंच निधन झाल्यानं कसबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी रुपाली पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अपेक्षा आहेत. (Rupali Thombre Patil expressed desire for Kasaba byelection MNS had cut her ticket earlier)

rupali thombre patil
Rahul Gandhi T-Shirt: राहुल गांधींना थंडी का वाजत नाही? टीशर्ट आला ट्रेंडिंगमध्ये!

आपली इच्छा व्यक्त करताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या, "राष्ट्रवादी काँग्रेसने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे. मुक्ताताईंच्या नंतर त्यांच्या घरात राजकारणात येण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यासाठी कोणीही नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाहीत, मुलगा सुद्धा लहान असून त्याचं नुकतंच लग्न झालं आहे"

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

दरम्यान, कसबा मतदारसंघात कामं झालेली नाहीत. सन २०१९ मध्ये मुक्ताताई आजारी आहेत म्हणून मनसेनं माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी आम्ही तडजोड केली पण नंतर या मतदारसंघात कुठलीही विकासाची कामं झाली नाहीत. इथल्या पोटनिवडणुकीत जनतेचा जो काही कौल असेल तो मी स्वीकारेल, असंही रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com