...म्हणून राज ठाकरेंच्या सभेसाठी उत्सुक होता का? रुपाली ठोंबरेचा जयंत पाटलांना सवाल

Rupali Thombre responds to Jayant Patil allegation against Raj Thackeray
Rupali Thombre responds to Jayant Patil allegation against Raj Thackeray

पुणे : ''राज ठाकरे यांना सध्या लोकप्रियतेची गरज आहे म्हणून ते वीजबीलाच्या मुद्यावरुन आरोप करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जयंत पाटलांनी केलेल्या वक्तव्यावरुन मनसेच्या नेत्यांनी याबाबत नाराजी दर्शवली आहे. याबाबत, ''लोकसभा निवडणुकींच्यावेळी राज ठाकरेंना लोकप्रियतेची गरज होती म्हणून त्यांची एक सभा व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील होता का? असा सवाल मनसे पुणे शहरच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी जयंत पाटील यांना विचारला आहे. 

राज ठाकरे यांनी राज्यातील वीज बिलांच्या मुद्यावरुन राज्य सरकाराला धारेवर धरले आहे. मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेवर जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. राज ठाकरे हे लोकप्रियता मिळावी म्हणून वीज बिलांच्या मुद्द्यांवरुन प्रश्न उपस्थित करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. जंयत पाटील यांच्या या वक्तव्यावरुन मनसे नेत्यांनी रोष व्यक्त केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान रुपाली पाटील यांनी जंयत पाटलांच्या वक्तव्याला प्रत्यूत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, ''जयंत पाटील आपण आज मंत्री आहात. आपल्या सरकारमधील मंत्री उर्जामंत्रीपदी असूनही वीजबिलाच्या मुद्यावरुन सर्वसामान्यांना लुबाडले जात आहे. त्यामुळे सराकार म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला आहे. लोकप्रियतेची गरज आहे ते लोकांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे नको ते वक्तव्य करण्याऐवजी वीजबीलाचा प्रश्न मार्गी लावावा हे निवेदन''

शिक्षा भोगणाऱ्या मित्राला वाढदिवसानिमित्त कारगृहाबाहेर दिली फटाक्यांची सलामी


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com