Gutkha Seized
sakal
- निलेश चांदगुडे
धायरी - नऱ्हे पोलिसांनी गुटखा माफियांविरोधात मोठी कारवाई करत गुजरात येथून विक्रीसाठी आणलेला तब्बल २२ लाख ९१ हजार ५३४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.