पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नव्या गावांमध्ये अद्याप विकासकामांना गती मिळालेली नसताना, या गावांचा तरतूद असलेला पाणी पुरवठ्याचा तब्बल २४ कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणासाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. या निधीतून जुन्या हद्दीतील पाणी पुरवठ्याची कामे केली जाणार आहेत.