FDA Action on Panner in Pune
sakal
पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बुधवार पेठ, शुक्रवार पेठ येथे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून सुमारे ३८ लाख रुपये किमतीचा ४ हजार ६०० किलो खवा आणि १२ हजार ५०० किलो पनीरचा साठा भेसळीच्या संशयातून जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी पहाटे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये करण्यात आली.