नारायणगाव - मुसळधार पावसामुळे टोमॅटोची फळे काळी पडली आहेत. तिरंगा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. भांडवली खर्चाच्या तुलनेत टोमॅटोला बाजारभाव मिळत नसल्याने टोमॅटो उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. उन्हाळी हंगाम वाया गेल्याने जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे ५० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.