diwali faral
sakal
पुणे - दिवाळी जवळ आली की परदेशातील नातेवाईक, मित्रमंडळींना फराळ व भेटवस्तू पाठविण्याची लगबग सुरू होते. यंदाही युरोप, अमेरिका, मध्यपूर्व व आशियायी देशांमध्ये राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना पारंपरिक फराळ पाठविण्यासाठी पुण्यातील अनेक नागरिकांनी आत्तापासूनच कुरिअर सेवांचे बुकिंग सुरू केले आहे. टपाल सेवेसह खासगी कुरिअर कंपन्यांच्या माध्यमातून हे बुकिंग केले जात आहे.