
महाराष्ट्राच्या गुन्हेगारी आणि राजकारणाच्या वर्तुळात सध्या निलेश घायवळ प्रकरणाने प्रचंड खळबळ माजली आहे. एम.कॉम आणि लॉ पदवीधर असलेला हा तरुण गुंड कसा झाला, यावरून सुरू झालेला वाद आता त्याच्या भावाचा शस्त्र परवाना आणि 'मुळशी पॅटर्न' चित्रपटातील भूमिकेपर्यंत पोहोचला आहे. कुख्यात गुंड सचिन घायवळवर खुनाचा प्रयत्न, आर्म्स अॅक्टसह अनेक गुन्हे दाखल असताना त्याला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीने २० जून २०२५ रोजी शस्त्र परवाना मिळाल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यात प्रवीण तरडे यांचे जुने स्पष्टीकरण पुन्हा चर्चेत आले आहे, ज्यात ते म्हणतात, "भाऊ गुन्हेगार म्हणजे सचिनचा दोष काय?"