
नागनाथ शिंगाडे, सकाळ वृत्तसेवा
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील सचिन रंगनाथ इंगळे यांना मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या "अव्वर सचिव पदावर" पदोन्नती मिळाली आहे. अभ्यासू वृत्ती, चिकाटी व जिद्द तसेच आई-वडिल व मार्गदर्शक शिक्षक यांच्या प्रेरणेने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून सचिन इंगळे यांनी अतुलनीय यश मिळवले होते.