
पुणे - सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील जनावरे न्यायालयाने परत करण्याचे आदेश दिले. तो आदेश तसेच संबंधित शेतकऱ्यांना घेऊन आमदार सदाभाऊ खोत भेकराईनगर येथील गोशाळेत सोमवारी गेले असता त्यांना ती जनावरे आढळली नाहीत. तेथे खोत यांना काही गोरक्षकांकडून धक्काबुक्कीचा प्रकार झाल्याची चर्चा सूरू होती. मात्र, पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की झाली नसल्याचे सांगितले आहे.