
"NIA Chief Sadanand Date to Speak in Pune on India’s Internal Security Challenges"
Sakal
पुणे : ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते यांचे शनिवारी (ता. २०) बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘अंतर्गत सुरक्षा : भारतासमोरील आव्हाने आणि उपाय’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.