Sadashiv Peth Car Accident : अपघातात जखमींची नावे आली समोर; जखमी विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घ्यावी अशी मागणी

Pune drink and drive Accident : भरधाव कारने 13 जणांना उडवले असून जखमींमध्ये बहुतांश एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते.
Pune drink and drive Accident
Pune drink and drive Accident Esakal
Updated on

पुण्यात सदाशिव पेठेत भरधाव कारने 13 जणांना उडवले असून जखमींमध्ये बहुतांश एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजते. तर एका विद्यार्थ्याचा पाय मोडला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या अपघातातील कारचालकासह त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता असं समजते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com