

सदगुरू स्पोर्टस्ने पटकावली पदके
कऱ्हाड, ता. ८ ः नाशिक येथे झालेल्या नाशिक स्पोर्टस् फाउंडेशन आयोजित चार ऑडिशन स्पोर्टस् कॉम्पिटिशनमध्ये येथील सद्गुरू स्पोर्टस् ॲकॅडमीच्या खेळाडूंनी दोन सुवर्णपदक, एक रजतपदक व दोन कांस्यपदके मिळवली. यामध्ये शिवांश नलवडे आठ वर्षे वयोगटात लांब उडीत सुवर्णपदक, सुमती चव्हाण १६ वर्षे वयोगटात गोळाफेकमध्ये रजत पदक, रेवती पाठकने उंच उडीमध्ये कांस्यपदक, रिया मोहितेने २०० मीटर धावणेत कांस्यपदक मिळविले. स्पर्धेमध्ये सद्गुरू स्पोर्टस् ॲकॅडमीच्या २६ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. यशस्वी खेळाडूंचे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य सी. जे. खिलारे, रयत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या पवार, डॉ. विद्या पाटील, सचिन चव्हाण, क्रीडा शिक्षकांनी अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूंना क्रीडाशिक्षक रामदास देशमुख, अस्मिता घारे, कविता कारंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो
PNE26W17552
कऱ्हाड ः सद्गुरू स्पोर्टस् ॲकॅडमीचे यशस्वी खेळाडू.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.