Pune News : "रीड टू मी ” क्रीएटिव्ह चॅम्पियन स्पर्धेत साधना विद्यालय अव्वल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadhana school tops in Read to Me Creative Champion competition pune

Pune News : "रीड टू मी ” क्रीएटिव्ह चॅम्पियन स्पर्धेत साधना विद्यालय अव्वल

हडपसर : राज्यसरकार व इंग्लिश हेल्पर या सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन आणि आकलन कौशल्य सुधारण्यासाठी काम केले जात आहे. त्यामाध्यमातून राज्यातील सरकारी शाळांमध्ये ' रीड टू मी' या ॲपचा वापर केला जातो. या उपक्रमांतर्गत इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धा घेण्यात आली होती.

त्यामध्ये वरद सुभाष साबळे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेमध्ये 'रीड टू मी' चा वापर करून वर्गात शिकवलेल्या इंग्रजी पाठाची उजळणी विद्यार्थी कशाप्रकारे करतात यावर एक सारांशरूपी व्हिडीओ बनवायचा होता. पुणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

त्यामध्ये जिल्ह्यातून इयत्ता सहावीसाठी साधना विद्यालय हडपसर मधील वरद सुभाष साबळे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळविला. पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने त्याचा सुवर्णपदक व प्रशस्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला. डायटच्या प्राचार्या शोभा खंदारे, अधिव्याख्याता महेश शेंडकर, सुवर्णा तोरणे, "रीड टू मी" टीम चे संदीप मंडलिक, प्रणव पेंडसे आदी यावेळी उपस्थित होते.

विद्यार्थी वरदला साधना विद्यालयातील "रीड टू मी" विभागप्रमुख स्मिता क्षीरसागर, विषयशिक्षिका शीला गंधट यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांचे रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्राचार्य दत्तात्रय जाधव, उपमुख्याध्यापिका योजना निकम पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, कुमार बनसोडे, माधुरी राऊत, आजीव सभासद लालासाहेब खलाटे, आजीव सेवक अनिल मेमाणे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :Pune Newseducation