Wed, March 29, 2023

Pune : खुशखबर! आता तेजस्विनी बसमधून महिलांना करता येणार मोफत प्रवास, पण...
Published on : 5 March 2023, 9:45 am
पुणे - महिलांसाठी सुरू केलेल्या तेजस्विनी या बसमधून प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. पीएमपीएलचा हा स्तुत्य उपक्रम येत्या ८ मार्च म्हणजेच अंतरराष्ट्रीय महिला दिनापासून सुरू केला जाणार आहे.
प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागात महिलांसाठी १९ मार्गांवर २४ तेजस्विनी बस सुरू आहेत. स्वारगेट, हडपसर, कात्रज, विश्रांतवाडी, निगडी, आकुर्डी, चिंचवड, अप्पा बळवंत चौक, पुणे महानगरपालिका अशा अनेक मार्गावर तेजस्विनी बस सुरू आहे.
महिला दिन आता अवघा तीन दिवसांवर आला आहे. त्यामुळे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यात पीएमपीएमएल प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.