वीस तासांच्या अथक प्रयत्नाने मांजराच्या पिलाची सुखरूप सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kitten
वीस तासांच्या अथक प्रयत्नाने मांजराच्या पिलाची सुखरूप सुटका

वीस तासांच्या अथक प्रयत्नाने मांजराच्या पिलाची सुखरूप सुटका

शिवाजीनगर - गोखलेनगर भागात मातृछाया सोसायटीच्या टेरेसवर पावसाच्या पाण्याच्या पाईपमधून मांजराचे पिल्लू (Kitten) थेट ड्रेनेजमध्ये (Drainage) पडले. पिल्लू व त्याची आई म्याव- म्याव करून एकमेकांना प्रतिसाद देऊ लागले. हे लक्षात येताच 'अमर मित्र मंडळाचे कार्यकर्ते अमर जाधव, प्रमोद लोखंडे, सर्पमित्र तेजस धोंगडे,अमित नवघणे,विशाल गुजर, सावंत बंधू,रोहिदास डिबंळे व त्यांचा मुलगा अथर्व ह्यांनी गांभीर्य ओळखून धाव घेतली.

हेही वाचा: छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या; तिघांजणावर गुन्हा दाखल

या सर्वानी मिळून मांजराच्या पिलाच्या प्रतिसादाप्रमाणे तेथील बांधकाम फोडून काढले.मोठे दगड ,फरशी फोडताना पिल्लू घाबरून अर्धा ते एक तास प्रतिसाद देत नसे ,आवाज आल्यावर पुन्हा सावधगिरीने काम सूरू करत अखेर अथर्वने त्याला आपल्या टप्यात येताच बाहेर काढले. जवळपास वीस तासाच्या प्रयत्नानंतर मांजराच्या पिल्लाला बाहेर काढण्यात यश आले.

पिल्लाला कापडाने पुसून त्याच्या आईकडे सोडताच ते एकमेकंना बिलगले. ते पाहून सगळे खूश झाले.व त्यांना " देवतारी त्याला कोण मारी " असाच प्रत्यय आला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :puneLifeCat
loading image
go to top