
Katraj Bridge Construction
Sakal
पुणे : कात्रज चौकात सुरू असलेल्या पुलाच्या कामादरम्यान सुरक्षा उपाययोजना न पाळल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे योग्य उपाययोजना कराव्यात, या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांचे कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाणे यांच्याकडे दिले आहे, अशी अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष अमर पवार यांनी दिली.