राज्यात पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; पुण्यात नवे अधिकारी

 Sagar Patil Rahul Shriram and Namrata Patil Appointed as Deputy Commissioners of Police in Pune
Sagar Patil Rahul Shriram and Namrata Patil Appointed as Deputy Commissioners of Police in Pune

पुणे : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या पाठोपाठ पोलिस उपायुक्तांच्या ही बदल्या गृह विभागाने केल्या. त्यानुसार सागर पाटील, राहुल श्रीरामे व नम्रता पाटील यांची पुण्यात पोलिस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे लोहमार्गच्या पोलिस अधिक्षकपदी सदानंद वायसे यांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या गृह विभागातर्फे बुधवारी रात्री काढण्यात आले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या बदल्यापाठोपाठ पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक यांच्या बदल्याचे आदेश गृह विभागाच्यावतीने बुधवारी रात्री काढण्यात आले. त्यामध्ये पुण्यातील काही पोलिस उपायुक्तांच्या अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या, तर अन्य शहरातील पोलिस अधिकाऱ्याची पुण्यात बदली करण्यात आली आहे.त्यानुसार नगरचे अपर पोलिस अधिक्षक सागर पाटील यांची पुण्यात परीमंडळ दोनच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर नागरी संरक्षण व होमगार्डचे अपर नियंत्रक राहुल श्रीरामे हे परिमंडळ चारच्या पोलिस उपायुक्त असणार आहेत. तर नम्रता पाटील या  परिमंडळ पाचच्या उपायुक्त असणार आहेत. पाटील यापूर्वी तराज्य गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्त होत्या. तर पुणे लोहमार्गच्या पोलिस अधिक्षकपदी सदानंद वायसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वायसे यापूर्वी नागरी संरक्षण व होमगार्डच्या प्रशासन व धोरण विभागाचे पोलिस अधीक्षक होते.

आता लॉयब्ररी देखील ऑनलाईन; विद्यार्थ्यांनो घरबसल्या करा अभ्यास

परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, पोलिस उपायुक्त प्रसाद अक्कानवरु, पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरणाचे पोलिस उपायुक्त सारंग आव्हाड यांची अन्यत्र बदली झाली असून त्यांच्या बदलीच्या ठिकाणचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार आहेत. असे गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी काढलल्या आदेशात नमुद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com