

PDR26B09466
सागर पुजारी यांचे अमेरिकत सादरीकरण
पंढरपूर, ता. ९ ः सागर पुजारी याच्या शोधनिबंधाचे अमेरिकन विद्यापीठात सादरीकरण सागर प्रकाश पुजारी यांना केंद्र सरकारच्या आयआयएम रांची या संस्थेतून पीएच. डी. मिळवली आहे. अमेरकेतील वॉर्थन स्कूल ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफ पेन्ससिलवानिया, फीलाडनडेल्फीया येथे सादरीकरण केले होते. सागर याचे प्राथमिक शिक्षण पंढरपूर येथील आदर्श प्राथमिक विद्यालय तर माध्यमिक शिक्षण कवठेकर हायस्कूलमध्ये झाले आहे. पुणे येथील मल्टिनेशनल ऑक्टोवेन फायनानसिअल कॉर्पोरेशन या कंपनीचे संचालक आहेत. सागर हे आपल्या येथील सौ.अलकनंदा व प्रकाश जगन्नाथ पुजारी यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत.त्याचे आजोबा पंढरपूरचे माजी आमदार पां. भा.डिंगरे यांचे पी एच डी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.याचा सागरला विशेष आनंद झाला. पंढरपूर सारख्या नागरी भागातील व्यक्तीने आय.आय.एम .संस्थेतून डॉक्टरेट मिळवणे ही प्रथमच घडले आहे.सागर पुजारी आणि त्याच्या परिवाराचे मन:पूर्वक अभिनंदन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.