Sahyadri wildflowers tourism: सह्याद्रीत रानफुलांचा रंगोत्सव; बेशिस्त पर्यटनामुळे नाजूक परिसंस्थेला वाढता धोका

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर रानफुलांचा रंगोत्सव; वाढत्या बेशिस्त पर्यटनामुळे नाजूक फुलांच्या अधिवासावर ताण, जैवविविधतेला धोका
The Sahyadri hill ranges have come alive with colourful monsoon wildflowers, while experts warn that unregulated tourism is threatening their fragile ecosystem.

The Sahyadri hill ranges have come alive with colourful monsoon wildflowers, while experts warn that unregulated tourism is threatening their fragile ecosystem.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : सह्याद्रीच्या डोंगररांगांवर पावसाने हिरवाईची चादर अंथरताच आता त्यावर रंगीबेरंगी रानफुलांची नक्षी उमटू लागली आहे. पुणे जिल्ह्यासह पश्चिम घाटातील घाटमाथे, पठारे आणि डोंगरउतारांवर पिवळी सोनकी, जांभळा तेरडा, पांढरी बटनफुले, निळी उट्रिक्युलरिया, स्मिथिया अशा असंख्य रानफुलांचा बहर पाहायला मिळत आहे. वर्षातील केवळ काही आठवड्यांसाठी खुलणाऱ्या या निसर्गसोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि छायाचित्रकारांची पावले सह्याद्रीकडे वळत आहेत. मात्र निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेतानाच रानफुलांच्या अधिवासाचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे वनस्पतीशास्त्र अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com