

Successful Lingana climb by Sahyadri Trekkers on International Mountain Day.
Sakal
कात्रज : आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमीत्त सह्याद्री ट्रेकर्सतर्फे महाराष्ट्रातील अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर यशस्वी चढाई करण्यात आली. ट्रेकर्सनी जेमिनिड उल्का वर्षावाचा आनंद मोहरी पठारावर अनुभवून बोराटा नाळीतून खाली उतरण्याची वाट धरली. अवघड व खडी चढाई असल्यामुळे सेफ्टीला प्रथम प्राधान्य देत हेल्मेट, हार्नेस, रोपसह क्लाइंबिंगचे सर्व आवश्यक साहित्य वापरून ३२ जणांच्या तुकडीने लिंगाणा सुळक्यावर यशस्वी चढाई केली.