साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे यंदाचा 'साई पुरस्कार' डॉ. पटवर्धन यांना प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Award Sainath Mandal Trust Budhwar Peth Provided Bhushan Patwardhan
साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे यंदाचा 'साई पुरस्कार' डॉ. पटवर्धन यांना प्रदान

साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे यंदाचा 'साई पुरस्कार' डॉ. पटवर्धन यांना प्रदान

पुणे : परदेशातून येते ते चांगलेच, सध्याच्या काळात असेच वातावरण झाले आहे आणि ही भावना चुकीची आहे. त्यामुळे आपल्यामध्ये आपल्याच गोष्टींविषयी कमीपणाची जाणीव निर्माण होत आहे. असे मत नॅकचे अध्यक्ष डाॅ.भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट तर्फे यंदाचा 'साई पुरस्कार' डॉ. पटवर्धन यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा, अमर राव, शंकर निंबाळकर, नरेंद्र व्यास, अमित दासानी, संकेत नंदकुमार ओव्हाळ आदी उपस्थित होते. पुरस्काराचे यंदा १५ वे वर्ष होते.

डॉ. पटवर्धन म्हणले, "आपण आपली हजारो वर्षांची परंपरा विसरत चाललोय. परंतु आपण आपली परंपरा विसरून चालणार नाही. लोककला परंपरा आणि संस्कृती सबळ करण्याचे काम गणेशोत्सव मंडळांनी केले आहे आहे. बदलत्या काळानुसार बदललेले कार्यकर्ते बघून आनंद होतो. पुण्याचे सामाजिक नेतृत्व गणेश मंडळांनी केले आहे.

डॉ. देखणे म्हणाले, "प्रभू श्रीराम हे सामाजिक जीवनाबरोबर, ज्ञान आणि विज्ञानाचे आदर्श आहेत. भारताला सामर्थ्यशाली बनवायचं असेल तर ज्ञानी व्हायला हवे. आजच्या शिक्षण संस्थामध्ये माहिती मिळते, पण शिक्षण संस्थेतील जीवन संस्था हरविली आहे."

भूषण गोखले यांनी मनोगत व्यक्त केले. पराग ठाकूर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Sai Award Sainath Mandal Trust Budhwar Peth Provided Bhushan Patwardhan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsawardSakal
go to top