esakal | ग्राहकांना त्रास कशाला? महावितरणला झालेले नुकसान 'असे' भरुन काढा!
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavitaran

नवीन सर्व्हिस कनेक्‍शन देताना 0.5 ते 7.5 किलोवॉट पर्यंत 7 हजार 150 रुपये शुल्क आकारणे आवश्‍यक होते. परंतु महावितरणने 3 हजार 100 रुपये या प्रमाणे शुल्काची आकारणी केली असल्याचे प्रकरण 'सकाळ'ने उघडकीस आणले आहे.

ग्राहकांना त्रास कशाला? महावितरणला झालेले नुकसान 'असे' भरुन काढा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नवीन सर्व्हिस कनेक्‍शन (वीजजोड) देताना निश्‍चित केलेल्या दरापेक्षा कमी दराने पैसे भरून घेतल्यामुळे महावितरणचे जे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांच्या पगारातून ते वसूल करावे, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे. "कोणत्याही परिस्थितीत ते ग्राहकांकडून वसूल करू नये, असेही मंचाचे म्हणणे आहे. 

वकिलांनो, 'असा' करा घरबसल्या दावा दाखल; जिल्हा न्यायालयाने केले आवाहन​

नवीन सर्व्हिस कनेक्‍शन देताना 0.5 ते 7.5 किलोवॉट पर्यंत 7 हजार 150 रुपये शुल्क आकारणे आवश्‍यक होते. परंतु महावितरणने 3 हजार 100 रुपये या प्रमाणे शुल्काची आकारणी केली असल्याचे प्रकरण 'सकाळ'ने उघडकीस आणले आहे. त्यामुळे महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे. 

भाजीपाला-फळे विक्रेत्यासाठी मोठी बातमी; पुणे महापालिकेने घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

वेलणकर म्हणाले, "या सर्व प्रकाराचे ऑडिट झाले पाहिजे. नेमके किती नुकसान झाले आहे, यांची माहिती समोर आली पाहिजे. तसेच या प्रकाराला जे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्या पगारातून पैसे वसूल करून हे नुकसान महावितरणने भरून काढावे. त्याचा भार नागरिकांवर टाकू नये. एकीकडे तूट असल्याचे महावितरणकडून दाखविले जाते. दुसरीकडे अशा प्रकारे कारभार होणार असेल, तर त्याला जबाबदार कोण? महावितरणला हे आर्थिक नुकसान परवडणारे नाही. त्यामुळे यांची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top