
पुणे : आपल्या आवडत्या किंवा आपल्याकडील दुर्मीळ पुस्तकांच्या छायाचित्रांचा लाखो वाचकांनी संबंधित लिंकवर पाडलेला प्रतिसादात्मक पाऊस...एकामागून एक अशा तब्बल १७ लाखांहून अधिक पुस्तकांच्या छायाचित्रांच्या पडताळणीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सांभाळलेली तांत्रिक बाजू...अन् पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने मिळालेले औचित्य साधून जगातील ‘पुस्तकांच्या मुखपृष्ठांच्या छायाचित्रांचा सर्वांत मोठा ऑनलाइन अल्बम’चा विश्वविक्रम ‘सकाळ माध्यम समूहा’ने रविवारी नोंदविला.