खरेदी करा मनपसंत कार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

एक्‍स्पोबाबत 
स्थळ - महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर
वेळ - सकाळी ११ ते रात्री ७
प्रवेश - सर्वांसाठी विनामूल्य 
सुविधा - प्रवेश व पार्किंग मोफत

पुणे - यंदाच्या दसरा व दिवाळी सणानिमित्त आपल्या घरी स्वप्नातली कार यावी, असे प्रत्येकाला वाटते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवारी (ता. २१) व रविवारी (ता. २२) ‘ऑटो एक्‍स्पो : २०१९’ चे आयोजन केले आहे.

विविध शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या फीचर्सची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. पण या साऱ्या प्रश्‍नांची उत्तरे जेव्हा एकाच छताखाली मिळतात, तेव्हा खऱ्या अर्थाने कार घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरते. 
बी. यू. भंडारी-हॉक्‍सवॅगन पुणे, ह्युंदाई मोटर्स, गारवे स्कोडा, होंडा कार्स, 
महिंद्रा अँड महिंद्रा, जीप पुणे-स्काय मोटो आदी कंपन्या सहभागी होणार आहेत.

स्मॉल कार्स, सेडान कार, हॅच बॅक कार, एसयूव्ही अशा अनेक गाड्यांची माहिती, त्यांच्या किमती आणि ईएमआयसंबंधीच्या प्रश्‍नांची उत्तरेही येथे मिळणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Auto Expo 2019