‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन; मनपसंत कार व दुचाकी खरेदीची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Auto Expo 2023

नवीन वर्ष, मकरसंक्रांत आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या स्वप्नातील गाडी घरी आणावी, अशी अनेकांची इच्छा असते.

Auto Expo 2023 : ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन; मनपसंत कार व दुचाकी खरेदीची संधी

पुणे - नवीन वर्ष, मकरसंक्रांत आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या स्वप्नातील गाडी घरी आणावी, अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे वाहन खरेदीचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने शनिवार (ता. १४) व रविवारी (ता. १५) भव्य ‘ऑटो एक्स्पो २०२३’ चे आयोजन केले आहे.

डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये हा एक्स्पो पार पडणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत एक्स्पो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

गेल्या वर्षी नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एक्स्पोला पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्याला अनुसरून नवीन वर्षांच्या सुरवातीलाच यंदाचा पहिला एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. एक्स्पोच्या निमित्ताने नामांकित कंपन्यांची वाहने एकाच ठिकाणी पाहण्याची व खरेदी करण्याची पर्वणी पुणेकरांना उपलब्ध होणार आहे. कार किंवा दुचाकी खरेदी करण्याचा निर्णय झाल्यानंतर विविध ठिकठिकाणच्या शोरूमला भेटी द्यायच्या, विविध कंपन्यांच्या गाड्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती घ्यायची, त्यांची तुलना करायची, बजेट लक्षात घ्यायचे, अशा हजारो प्रश्नांची उत्तरे शोधत फिरावे लागते. पण, या साऱ्या प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने गाडी घेण्याचे स्वप्न वास्तवात उतरेल.

याचाच विचार करून ‘सकाळ’ने दोन दिवसांच्या ऑटो एक्स्पोचे आयोजन केले आहे. बजेटनुसार गाडी घेणाऱ्यांसाठी हा एक्स्पो महत्त्वाचा ठरणार आहे. कारण या ठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि दुचाकी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे त्यांची वैशिष्ट्ये आणि किमती आदींइतर इतर माहिती घेणे सोपे होणार आहे. एवढेच नाही तर या एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचेही (ईव्ही) अनेक पर्याय पाहायला मिळतील.

एक्स्पोत सहभागी होत असलेले कंपन्या -

सिट्रोएन, टोयोटा, स्कोडा, फोक्सवॅगन, एमजी, किया, महिंद्रा, टाटा, मारुती सुझुकी, नेक्सा, हुंदई, निस्सान, होंडा कार्स, हिरो, सुझुकी, जीप, तुनवाल, बीगॉस, इजीराइड, एथर

वित्तपुरवठ्याचे पर्याय उपलब्ध -

ऑटो एक्स्पोमध्ये बजेट कार्स, सेडान कार्स, हॅचबॅक कार्स, एसयुव्ही, स्पोर्ट, इलेक्ट्रिक कार्स, ईव्हची दुचाकी अशा अनेक वाहनांची माहिती मिळणार आहे. अनेक नव्याने लाँच झालेल्या गाड्याही येथे पाहायला मिळतील. वाहन खरेदीसाठी वित्तपुरवठ्याचे अनेक पर्यायही एक्स्पोत उपलब्ध आहेत. त्यांच्या ईएमआयसंबंधीच्या प्रश्नांची उत्तरेही ग्राहकांना याठिकाणी मिळणार आहेत.

सकाळ ऑटो एक्स्पो २०२३ बाबत -

कुठे : पंडित फार्म्स, डीपी रोड, कर्वेनगर

कधी : १४ आणि १५ जानेवारी २०२३

वेळ : सकाळी ११ ते रात्री ८

प्रवेश व पार्किंग मोफत

स्टॉल आणि इतर माहितीसाठी संपर्क - ९३२५१०६६२६