पुणे - वाहनप्रेमींसाठी पर्वणी ठरणाऱ्या ‘सकाळ ऑटो एक्स्पो’ला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली. यामध्ये नागरिकांना दुचाकी, चारचाकी आणि इलेक्ट्रिक वाहनांचे २० हून अधिक ब्रँड्स व ६० पेक्षा अधिक मॉडेल्स एकाच छताखाली पाहण्याची, टेस्ट राईड घेण्याची आणि फायनान्स सल्लागारांकडून थेट मार्गदर्शन मिळवण्याची अनोखी संधी मिळाली.