

Sakal-Auto-Expo 2026
sakal
पुणे - वाहन खरेदीचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रातील नव्या घडामोडी जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने १३ व १४ जूनला ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे. कर्वेनगरमधील डी.पी. रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये होणारा हा एक्स्पो सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे.