Sakal Chitrakala Spardha 2023 : सेंट हिल्डाज शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून कोरोनाशी लढण्याचा दिला मार्मिक संदेश

रविवारची सुट्टी व गुलाबी थंडी असतानाही सकाळी कंटाळा न करता हिरहिरीने यात स्पर्धेत चित्र काढण्याचा आनंद
Sakal Chitrakala Spardha 2023 message to fight against Corona school student pune
Sakal Chitrakala Spardha 2023 message to fight against Corona school student punesakal
Updated on

कॅन्टोन्मेंट : कोरोना या प्राणघातक आजारावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोना सोबत लढण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे अगत्याचे आहे. आज या कोरोनाने आपल्याला सर्व स्तरावरची शिस्त व स्वच्छतेची शिकवण दिली आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसह डॉक्टर, पोलीस, प्रशासन दिवस-रात्र लढत आहेत. अशी माहिती अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत कोरोनाशी लढूया असा मार्मिक संदेश दिला. गुरुवार पेठेतील सेंट हिल्डाज शाळेत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत एकूण ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

रविवारची सुट्टी व गुलाबी थंडी असतानाही सकाळी कंटाळा न करता हिरहिरीने यात स्पर्धेत चित्र काढण्याचा आनंद घेतला. यावेळी विद्यार्थ्यांची कोरोना, स्वच्छता, उद्यान, क्रिकेट, बँका आदी विषयावरील स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

तसेच विद्यार्थ्यांनी सकाळचे आभार मानण्यासाठी सकाळ नावाची प्रतिकृती सादर केली. प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका बिनिता राठोड सह शिक्षक, सेवक आदी कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Class 10 Student with 80% Marks Missing After Argument Over Mobile Gaming
Teacher Arrested Under POCSO for Exploiting Student
Amar Mahajan inspirational story from Jalgaon
Minor student blackmail case in Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com