Strong Protective Iron Pipes Installed on Stream Bridges Loni Kalbhor
sakal
लोणी काळभोर - दै. सकाळने १ जुलै रोजी 'लोणी काळभोर येथे पालखी तळावर कचरा' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून पालखी तळावरील अस्वच्छता आणि वारकऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आणला होता. या वृत्ताची प्रशासनाने तातडीने दखल घेत पालखी तळावरील कचरा हटविण्यात आला असून, ओढ्यावरील पुलांवर पूर्वीच्या धोकादायक जाळ्यांऐवजी भक्कम लोखंडी पाईप बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यापूर्वी संभाव्य अपघाताचा मोठा धोका टळल्याने वारकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.