कष्टप्रद जीवनप्रवासाला लाभले यशाचे कोंदण

Sakal-Excellence-Award
Sakal-Excellence-Award

जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर आपल्या उद्योग- व्यवसायात यशाचे शिखर गाठलेल्या आणि बांधीलकी जपणाऱ्या पुणे शहर आणि उपनगरांतील निवडक कर्तृत्ववान व्यक्तींचा ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. या सन्मानाने भारावून गेलेल्या या पुरस्कारार्थींनी आपल्या प्रतिक्रिया ‘सकाळ’कडे  व्यक्त केल्या.

आशिष दुगड - सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड स्वीकारताना मला मनापासून आनंद झाला. गेली पंधरा वर्षे केलेल्या कामाचे व यशाचे आम्हाला प्रशस्तिपत्रक मिळाले आहे. हे आमच्या पिढीला ऊर्जा देणारे, प्रेरणादायी व प्रोत्साहन देणारे आहे. पद्मश्री प्रतापराव पवार, पद्मश्री तात्याराव लहाने यांच्याकडून हा ॲवॉर्ड स्वीकारला त्यामुळे ‘सकाळ समूहा’चे आम्ही आभार मानतो.

अजय मुथा - सकाळ समूहाकडून मिळालेल्या ॲवॉर्डमुळे केलेल्या कामाचे फलित झाले आहे. आता खांद्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजसेवेचा घेतलेला हा वसा तुमच्यासोबत पूर्णत्वास नेतो याची खात्री देतो. पुरस्कारासाठी माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल व पारितोषिक स्वरूपात केलेल्या कामाची पावती दिल्याबद्दल मी सकाळ समूह आणि वाचकांचे आभार मानतो.

कांतिलाल ओसवाल - हा पुरस्कार म्हणजे माझा, माझ्या व्यवसायाचा आणि सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे. या सन्मानामुळे आयुष्यात आजवर केलेली मेहनत, निष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल अभिमान वाटतो. हा पुरस्कार मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील. हा माझ्या आयुष्यातील विशेष भाग्याचा दिवस आहे.

डॉ. राजीव जगताप व डॉ. विद्या जगताप - कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे मनात ठेवूनच प्रत्येक डॉक्‍टर रुग्णासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. आपल्या प्रामाणिकपणाचे कौतुक कोणी जाणीवपूर्वक केले तर ते मनाला सुखावून जाते आणि पुढील प्रगतीसाठी स्फूर्ती मिळते. ‘सकाळ’ परिवाराने आम्हाला जगताप मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला एक्‍सलन्स ॲवॉर्ड प्रदान केला. त्याबरोबरच आमच्यावर एक्‍सलन्समध्ये सातत्य राखण्याची आणि प्रगतीची नवी शिखरे गाठण्याचे ध्येय ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. 

सचिन लगड - विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्ती व संस्थांना ‘सकाळ’तर्फे नुकताच एक्‍सलन्स ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आले, यात बांधकाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कार्यासाठी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल मी दैनिक ‘सकाळ’चा मनापासून आभारी आहे. कार्यक्रमाचे नियोजन, निवडलेले ठिकाण, शिस्तबद्ध मांडणी आणि एकूणच कार्यक्रमाचे स्वरूप एकदम झकास होते. कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर व त्यांचे मार्गदर्शन उल्लेखनीय होते.

संजय हरपळे - ‘सकाळ’ने एक्‍सलन्स ॲवॉर्ड देऊन माझ्या कामाचा सन्मान केला आहे. या पुरस्कारामुळे नवी उमेद प्राप्त झाली आहे. भविष्यातील माझ्या नव्या संकल्पनांना प्रोत्साहन मिळाले आहे. या ऊर्जेवर पुढील काळात मला अधिक चांगले आणि आदर्शवत काम उभे करण्यास मदत होणार आहे. सामाजिक जाणीव ठेवून काम करणारा एक व्यावसायिक म्हणून झालेल्या या गौरवाने माझी जबाबदारी वाढली आहे. आपल्या वाटचालीला ‘सकाळ’च्या माध्यमातून यशाचे वलय लाभले आहे. त्यामुळे मला आनंद झाला असून, हा आनंद सर्वसामान्यांच्या जीवनात पेरण्याचे काम यापुढेही माझ्याकडून होईल. 

अतुल कारले - सामाजिक कार्यात काम करताना शाबासकीची थाप देऊन ‘तुम्ही फक्त लढ म्हणा’ असे म्हणण्याने नवीन ऊर्जा मिळते. ‘सकाळ’चा हा पुरस्कार असाच ऊर्जादायी आहे. त्यामुळे कामाची जबाबदारी आणखीन वाढली आहे आणि नव्या जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. या पुरस्कारामुळे ‘सकाळ’ परिवाराशी नाते अधिक दृढ झाले आहे. तसेच हा पुरस्कार घेताना व्यक्तीसोबत कुटुंबालादेखील प्राधान्य दिल्याने अधिकच आनंद झाला.

राजेंद्र बांदल - सकाळ माध्यम समूहाने एक्‍सलन्स ॲवॉर्ड पुरस्कार देऊन आतापर्यंत केलेल्या कामाची पोच पावती दिली आहे. सातत्याने परिश्रम करून मिळालेल्या यशाचा आनंद या पुरस्काराने द्विगुणित झाला आहे. या पुरस्कारामुळे समाजातील नामवंतांशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. ‘सकाळ’च्या प्रत्येक घटकाने पुरस्कारार्थींचे केलेले अनोखे स्वागत कायम स्मरणात राहील. या पुरस्कारामुळे विविध व्यवसायांच्या माध्यमातून काम करण्यास भविष्यात अधिक ऊर्जा मिळणार आहे. पुरस्कारामुळे आनंदाबरोबर जबाबदारी वाढल्याचीही जाणीव झाली आहे.

डॉ. संजय चोरडिया - सकाळ समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि डॉ. तात्यासाहेब लहाने या दोन दिग्गज पद्मश्री व्यक्तींकडून हा पुरस्कार मिळाला. याचा खूप मोठा आनंद आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात काम करण्यासाठी खूप प्रेरणा मिळणार आहे. एज्युकॉन या जागतिक परिषदेच्या माध्यमातून पवारसाहेब यांच्याबरोबर जाण्याचा योग येतो. त्या वेळी त्यांच्यातले विविध पैलू पहावयास मिळतात. त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळते. समाज, युवक आणि नव्या पिढीकरिता नवे ज्ञान देत राहू.

स्वप्नील अमराळे - एक्‍सलन्स ॲवॉर्ड पुरस्कार दिल्याबद्दल सर्वप्रथम सकाळ माध्यम समूहाचे मनःपूर्वक आभार मानतो. या सन्मानामुळे जोमाने काम करण्याची उमेद मिळाली आहे. गेल्या तेवीस वर्षांपासून अमराळे ज्वेलर्सला आमच्या सर्व ग्राहकांनी दिलेल्या प्रेमाचा हा सन्मान आहे. येत्या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा. त्यानिमित्त अमराळे ज्वेलर्सने ग्राहकांसाठी विविध आकर्षक ऑफर्स सुरू केल्या आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. या पुरस्कारामुळे ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्याच्या आमच्या जबाबदारीतही वाढ झाली आहे.

डॉ. लक्ष्मीकांत गजेश्वर - सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्डने सन्मानित केले, त्याबद्दल सकाळ समूहाचा मी मनापासून ऋणी आहे. हा गौरव म्हणजे लहान मुलांचे आरोग्य जपण्यासाठी आतापर्यंत मनापासून केलेल्या चांगल्या कामासाठी कौतुकाची थाप आहे. या पुरस्कारामुळे पुढील कार्यासाठीही ऊर्जा मिळाली. गेली १६ वर्षे ग्रामीण आणि शहरी भागातील मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी सुरू केलेल्या कामाला प्रोत्साहन मिळाले. हा गौरव मला व माझ्या सिंधू नर्सिंग होममधील टिमला पुढील वाटचालीसाठी निश्‍चितच प्रेरणादायी ठरेल.

वैशाली गलांडे :- भातुकलीच्या कामाची दखल घेऊन एक्‍सलन्स ॲवॉर्डने सन्मानित केल्याबद्दल सकाळ मीडियाचे आभारी आहे.  या सन्मानामुळे आम्हाला लहान मुलांसाठी नावीन्यपूर्ण ॲक्‍टिव्हिटीज आणि विविध सुविधा निर्माण करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळाली आहे. यातून समाजाच्या सर्व स्तरातील लोकांपर्यंत भातुकलीचा विचार आणि नोकरदार पालकांबद्दलची काळजी पोचली. अनेक पालकांना भातुकलीच्या कामाची माहिती मिळाली. भातुकली डे केअर आणि ॲक्‍टिव्हिटी सेंटर सध्या समविचारी लोकांना बरोबर घेऊन फ्रेन्चायीसी तसेच संस्थांशी त्यांच्या कर्मचाऱ्याच्या मुलांसाठी डे कॅरेट फॅसिलिटी देण्याच्या विचारात आहे. 

रघुनाथ येमुल गुरुजी - ‘सकाळ’सारख्या लोकप्रिय वृत्तपत्राने माझ्या सामाजिक, आध्यात्मिक दिव्यांगांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन मला अधिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे माझ्यासह अनेकांना भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यासंदर्भात ऊर्जा व प्रेरणा देणारा असा हा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे समाजात मिळणारे आदराचे स्थान ही आमच्या कामाला ‘सकाळ’च्या माध्यमातून समाजाने दिलेली पोचपावती आहे. यामुळे अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असून, यापुढेही ही समाजसेवा सदैव करत राहण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

डॉ. सागर बालवडकर - ‘सकाळ’सारख्या राज्यातील अग्रगण्य माध्यम समूहाने या वर्षापासून विविध क्षेत्रांत कार्यरत व्यक्तींना सन्मानित करण्याचा सुरू केलेला उपक्रम हा अनोखा आहे. यामुळे विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्यांसाठी हे पाठीवर थाप टाकण्याचे व प्रेरित करण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘सकाळ’ परिवाराने केले आहे. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली असून, मला अधिक कार्य करण्याची स्फूर्ती व ऊर्जा मिळाली आहे. यामुळे मी अधिक कार्यशील होऊन शैक्षणिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य करून दाखवील असा मला आत्मविश्‍वास आहे. तसेच ‘सकाळ’ परिवाराने मला हा पुरस्कार देऊन माझा सन्मान केला याबद्दल मी शतशः ऋणी आहे.

नीरज कुदळे - ‘सकाळ’ परिवाराने केलेला माझा सन्मान माझ्या आयुष्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा व सन्मान देणारा असून, ही एक कौतुकाची थाप आहे. माझे आजोबा आणि वडील यांचे मार्गदर्शन, नीतिशास्त्र, कठोर परिश्रम आणि आशीर्वाद यामुळेच मी पुढे जाण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे व करत राहील. त्यांच्यासह आता ‘सकाळ’ सारख्या माध्यम समूहाने दिलेल्या या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे. उद्योग -व्यवसायायात कार्यरत असलेल्या माझ्यासारख्याच केलेला हा बहुमान म्हणजे आमच्या तिन्ही पिढ्यांनी केलेल्या कार्याची पोचपावतीच आहे. उत्कृष्ट नियोजनाबद्दल ‘सकाळ’ परिवाराचे खूप खूप धन्यवाद.

शशांक मेंगडे - ‘सकाळ’ने माझा गौरव करणे हे माझ्या कष्टाला सन्मान देण्यासारखे आहे. या सन्मानाने आणखी माझी जबाबदारी वाढली आहे. जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचून त्यांना दर्जेदार कॉफी देणे हेच ध्येय घेऊन पुढील वाटचाल करणार आहे.

रंजन कोळंबे - ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ मिळणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. आम्ही केलेल्या संघर्षाला हा खऱ्या अर्थाने सन्मान मिळाला, असे आम्हाला वाटते. यामुळे पुन्हा अनेक विद्यार्थी घडवण्याचे पाठबळच आम्हला मिळाले आहे.

प्रवीण बढेकर - हा माझा व्यावसायिक म्हणून सन्मान नसून, माणूस सजग असण्याचा सन्मान आहे, असे मी मानतो. समाजात वावरताना आपण केलेल्या प्रत्येक कृतीची नोंद सजगपणे घेणारा माध्यम समूह म्हणजे ‘सकाळ’! विविध क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणाऱ्यांचा गौरव होत असताना, माझीदेखील त्यांनी निवड केली. ‘सकाळ’च्या व्यासपीठावरून माझा सन्मान होणे हे केवळ अलौकिक समाधान देणार आहे.

कालिदास मोरे - ‘सकाळ’चा एक्‍सलन्स अवॉर्ड २०१९ हा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद झाला. यामुळे गुडविल इंडियाने केलेल्या कामाची एक प्रकारे पोचपावतीच मिळाली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझा जाहीर सत्कारही केला. या सामाजिक कार्याच्या माध्यमातून आम्ही अनेक नागरिकांशी जोडलो गेलो आहोत. ‘सकाळ’चे पुन्हा एकदा मनापासून आभार.

ज्ञानेश्वर तापकीर - ‘सकाळ एक्‍सलन्स अवॉर्ड हा मी सहकार क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस वर्षांमध्ये केलेल्या कार्याचा गौरव समजतो. यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले; परंतु पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. तात्याराव लहाने व प्रतापराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे म्हणजे जीवनाला व केलेल्या कार्याला प्रेरणा व ऊर्जा मिळाली असे मी समजतो. चांगले सहकारी मिळणे, चांगला सेवाभावी सेवकवर्ग मिळणे, हे समृद्ध सहकाराचे प्रतीक आहे, असा माझा अनुभव आहे.

सारंग राडकर - व्यंकटेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, रंग क्रिएशन, बालाजी वस्त्र भांडारच्या माध्यमातून आम्ही प्रामाणिक व सचोटीने व्यवसाय करत आहे. या कामाची दखल घेऊन ‘सकाळ माध्यम समूहा’ने दिलेल्या पुरस्कारामुळे आजपर्यंत केलेल्या कष्टाचे व मेहनतीचे खरे सार्थक झाले. पुरस्कारामुळे आमच्या व्यवसायाची उंची वाढण्यास मदत होईल. सामाजिक सेवेसाठी नवीन ऊर्जाच मिळाली. ‘सकाळ’चा मी सदैव ऋणी असेल.

सुरेश हुले - ‘सकाळ’ने माझ्या कार्याची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल मी आभारी आहे. ‘सकाळ’कडून समाजातील अशा घटकांची दखल घेतली जाते. शहराची ओळख केवळ निवृत्तीधारकांचे शहर ही पुसली जाऊन कॉस्मोपॉलिटन शहर अशी होत आहे. 

शांतिलाल धोका - नामवंत ट्रॅव्हल्स कंपनीमध्ये नाव कमावलेल्या एका शेतकरी कुटुंबातील तरुणाला गौरविल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार. ग्रामीण भागातील तरुणांना त्याचा अभिमान असून, शेतकरी कुटुंबातील तरुण केवळ शेती व्यवसाय न करता इतर व्यवसायामध्ये कमी नाहीत याची ही पोचपावती आहे. ‘सकाळ’च्या या उपक्रमामुळे नक्कीच अधिक जोमाने समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com