सकाळच्या तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाअंतर्गत पोलिसांना पोषक आहार

रोटरी कल्ब ऑफ भिगवणच्या वतीने भिगवण पोलिस ठाण्यामध्ये चिकी, फळे व पोषक आहाराचे वाटप
सकाळच्या तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाअंतर्गत पोलिसांना पोषक आहार
सकाळच्या तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाअंतर्गत पोलिसांना पोषक आहारsakal

भिगवण : उत्सवाच्या काळात पोलिस प्रशासनावरील वाढत्या ताणांमध्ये त्यांचे मनोधैर्य वाढावे व पोलिस करत असलेल्या कर्तव्याकडे समाजाचे लक्ष वेधावे या हेतुने सकाळ माध्यम समुहाच्या वतीने सुरु केलेल्या तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमाअंतर्गत येथील रोटरी क्लबच्या वतीने पोलिसांना चिकी, फळे व पोषक आहाराचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून आम्ही तुमच्या कार्याला सलाम करतो अशी भावना सामाजिक संघटना व नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांना सकाळच्या सुगरण उपक्रमांविषयी माहिती देण्यात आली.

सध्या कोरोना व नेहमी गोविंदा, गणेशोत्सव, गौरी आदी एकापाठोपाठ येणाऱ्या सणांमुळे पोलिस प्रशासनावर मोठा ताण येतो. अनेकदा त्यांना सणासुदीच्या काळात घराकडेही जाता येत नाही. पोलिस प्रशासनाच्या कर्तव्याकडे समाजाचे लक्ष वेधावे या हेतुन सकाळच्या वतीने तंदुरुस्त बंदोबस्त ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमाअंतर्गत येथील रोटरी कल्ब ऑफ भिगवणच्या वतीने भिगवण पोलिस ठाण्यामध्ये चिकी, फळे व पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, भिगवण रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय खाडे, सचिव सुषमा वाघ, सचिन बोगावत, रियाज शेख, कमलेश गांधी, संजय चौधरी, कमलेश गांधी, संपत बंडगर, प्रदीप वाकसे, प्राचार्य तुषार क्षीरसागर, औदुंबर हुलगे, रणजित भोंगळे,डॉ. अमोल खानावरे,संतोष सवाणे, प्रवीण वाघ,रेखा खाडे, मिनाताई बंडगर, वैशाली बोगावत, पोलिस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील,सुभाष रुपनवर, रुपेश कदम, आदींसह रोटरी क्लबचे सदस्य व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

सकाळच्या तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रमाअंतर्गत पोलिसांना पोषक आहार
'मुख्यमंत्र्यांच्या भावी सहकारी विधानामागे राष्ट्रवादीला सूचक इशारा'

याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार म्हणाले, सार्वजनिक उत्सवाच्या काळात पोलिस प्रशासनावर बंदोबस्ताचा मोठा ताण असतो ही वस्तुस्थिती आहे. समाजाकडुन पोलिसांना साथ मिळाल्यास हा ताण काही प्रमाणात निश्चित कमी होतो. सकाळ माध्यम समुहांने ही बाब समाजाच्या लक्षात आणुन दिली व रोटरी सारख्या संस्था पुढे येऊन तंदुरुस्त बंदोबस्त साऱखा उपक्रम राबवुन पोलिसांना साथ देत आहेत ही पोलिसांचे मनोधैर्य वाढविणारी बाब आहे. सकाळचे प्रतिनिधी डॉ. प्रशांत चवरे यांनी सुगरण स्पर्धेविषयी माहिती दिली व प्रवेशिकांचे वितरण करण्यात आले.

सचिन बोगावत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संजय खाडे यांनी, सुत्रसंचालन रणजित भोंगळे यांनी तर आभार औदुंबर हुलगे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सकाळचे वितरण प्रमुख योगेश निगडे, सकाळचे बातमीदार डॉ. प्रशांत चवरे व वितरक संतोष सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com