'मुख्यमंत्र्यांच्या भावी सहकारी विधानामागे राष्ट्रवादीला सूचक इशारा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar - Uddhav Thackeray

'मुख्यमंत्र्यांच्या भावी सहकारी विधानामागे राष्ट्रवादीला सूचक इशारा'

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आज मराठवाड्यामध्ये (Marathwada) आहेत. एका कार्यक्रमात आज उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb danwe) एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना 'आजी, माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी' असं विधान केलं. त्यावरुन आता मोठ्या प्रमाणात राजकीय तर्क-वितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना-भाजपा (shivsena-bjp) पुन्हा एकत्र येणार? ही चर्चा सुरु झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी "या विधानावरुन लगेच तर्क विर्तक करणं राजकारणात योग्य आहे, अस मला वाटत नाही" अशी प्रतिक्रिया दिली. "काल चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी मिश्किलपणे ही टिप्पणी केली आहे" असे ते म्हणाले

हेही वाचा: मरीनड्राइव्ह: गाडीत बसलेल्या व्यक्तीच्या डोक्याला बुंदक लावली आणि...

"त्यांचं हे विधान गांभीर्याने घ्यायचं म्हटलं तर, उद्या भाजपासोबत जायचं असेल तर माझ्या मानाच तयारी आहे, माझा पक्ष तयार आहे, असा त्यामागे संदेश असू शकतो. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दबावाचं राजकारण करु नये, कुरघोडी करु नये, यासाठी भाजपासोबत जाण्याचा पर्याय माझ्यासमोर खुला आहे, असा संदेशही त्यांना द्यायचा असेल हा सुद्धा अर्थ निघतो" असे दरेकर म्हणाले.

हेही वाचा: औरंगाबाद : दानवेंची मुख्यमंत्र्यांसमोर तुफान फटकेबाजी!

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर तुम्ही आनंदी आहात का? या प्रश्नावर दरेकर म्हणाले की, "राजकारणात आनंद, दु:ख आपल्या बोलण्यावर नसतं. भाजपाची भूमिका ती माझी भूमिका आहे. मी आनंद व्यक्त केला आणि उद्या भाजपाचं धोरण युती करायचं नसेल, तर माझ्या आनंदाला काय अर्थ आहे? त्यामुळे पक्षााच्या भूमिकेतून जे निष्पन्न होईल, त्यात माझा आनंद आहे" असे दरेकर म्हणाले.

Web Title: On Cm Uddhav Thackeray Possible Allies Statement Pravin Darekar Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..