देश-विदेशातील डेस्टिनेशनला पर्यटकांची पसंती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 जानेवारी 2020

विजेते... 

  • सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर २०२० विजेते - सुदर्शन वंदकर 
  • डस्क टू डॉन कॅटेगरी - प्रथम- राहुल बुलबुले, द्वितीय- दर्शन सेठिया, तृतीय- प्रतीक जोशी 
  • लॅंडस्केप कॅटेगरी - प्रथम- राहुल देशमुख, द्वितीय- गौरव मोहिरे, तृतीय- उत्कर्ष पाटील 
  • स्ट्रक्‍चर कॅटेगरी - प्रथम- प्रतीक वाडेकर, द्वितीय- शब्बीर पाथरिया, तृतीय- हर्ष लुणावत 
  • स्ट्रीट अँड पीपल कॅटेगरी - प्रथम- मुकुंद पारखे, द्वितीय- अभिषेक परदेशी, तृतीय- शांभवी फुले 

पुणे - कर्वेनगर येथील राजा मंत्री मार्गावरील (डीपी रस्ता) पंडित फार्म येथे आयोजित ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’ची पर्यटकांच्या भरघोस प्रतिसादाने सांगता झाली. शनिवारी (ता. २५) आणि रविवारी (ता. २६) मोठी गर्दी झाली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

एकाच छताखाली टुरिस्ट डेस्टिनेशन निश्‍चित करण्याची संधी आणि त्यावर मिळणाऱ्या भरघोस सवलती यामुळे हा कार्निव्हल पर्यटकांना आकर्षित करणारा ठरला.पूर्वांचल, अंदमान, लेह आणि सियाचिन या देशांतर्गत डेस्टिनेशनसह विदेशातील युरोप, भूतान, सिंगापूरलाही पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. कार्निव्हलला भेट दिल्यानंतर मनाजोगे पॅकेज मिळाल्याचा आनंद नवविवाहित जोडपे व विदेशवारी करणाऱ्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ट्रॅव्हलर्सतर्फे ‘लकी ड्रॉ’ विजेत्यांना मोफत विमान प्रवासाची संधी मिळाली.  

पुणे : लोकसभा निवडणूकीत केले काम; अजूनही मिळाला नाही दाम

‘ट्रॅव्हल फोटोग्राफर’चा सन्मान
‘सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर २०२०’ या स्पर्धेच्या विजेत्यांचा रविवारी सन्मान करण्यात आला. या वेळी मुख्य परीक्षक मिलिंद ढेरे उपस्थित होते. नॅंट व्हेंचर आणि ब्लू काउंटी पाचगणी हे या छायाचित्र स्पर्धेच्या बक्षिसांचे प्रायोजक होते. कार्निव्हलमध्ये विजेत्यांनी काढलेल्या आणि निवडक सर्वोत्तम छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे स्वतंत्र दालन सजविण्यात आले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Holiday Carnival Send Up