देश-विदेशातील पर्यटनाचे भरगच्च पर्याय कोठे ते पहा

पंडित फार्म, कर्वेनगर - ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’मध्ये विविध स्टॉलवर पर्यटकांनी केलेली गर्दी.
पंडित फार्म, कर्वेनगर - ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’मध्ये विविध स्टॉलवर पर्यटकांनी केलेली गर्दी.

पुणे - देश-विदेशातील पर्यटनाचे भरगच्च पर्याय, किफायतशीर पॅकेजेस, ॲडव्हेंचर हॉलिडेपासून समुद्रातील क्रूझ सफरीपर्यंतचे विविध पर्याय यामुळे शनिवारी ‘सकाळ हॉलिडे कार्निव्हल’ला पर्यटकांनी गर्दी केली होती. देशांतर्गत पर्यटनाइतकेच सातासमुद्रापारच्या सफरीला मराठी पर्यटकांची वाढलेली पसंती ‘कार्निव्हल’मध्ये स्पष्ट दिसून येत होती.

‘सकाळ’च्या वतीने हा हॉलिडे कार्निव्हल कर्वेनगर येथील राजा मंत्री मार्गावरील (डीपी रस्ता) पंडित फार्म येथे आयोजित केला आहे. रविवार (ता. २६)पर्यंत चालणारा हा कार्निव्हल सकाळी ११ ते ९ या वेळेत खुला राहील. एकाच छताखाली आपले टुरिस्ट डेस्टिनेशन निश्‍चित करण्याची संधी आणि सवलतींमुळे हा कार्निव्हल पर्यटकांना आकर्षित करणारा ठरला. कार्निव्हलला भेट दिल्यानंतर मनाजोगे पॅकेज मिळाल्याचा आनंद नवविवाहित जोडप्यांसह निवृत्तीनंतर विदेशवारी करणाऱ्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर दिसत होता. प्रदर्शनात ताडोबा, पेंच आणि लेहमधील सियाचीनबद्दलच्या गिरिदर्शनच्या स्टॉलला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

अविस्मरणीय ‘क्‍लिक’
पर्यटनात अनुभवलेले क्षण जतन करण्याचे काम कॅमेरा करतो. कॅमेऱ्याशी जडलेले हेच नाते ‘सकाळ ट्रॅव्हल फोटोग्राफर ऑफ द इयर २०२०’ या स्पर्धेच्या निमित्ताने अधिक घट्ट झाले. स्पर्धेतील विजेत्यांनी काढलेल्या आणि निवडक सर्वोत्तम छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे स्वतंत्र दालन कार्निव्हलमध्ये सजविण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता. २६) संध्याकाळी ६ वाजता प्रदर्शनस्थळी होणार आहे. या वेळी परीक्षक मिलिंद ढेरे, विशाल जाधव उपस्थित राहणार आहेत.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘हॉलिडे कार्निव्हल’सुरू असल्याचे कळाले. एकाच छताखाली एवढे सगळे पर्याय उपलब्ध असल्यामुळे पत्नीसह पर्यटनाचे पॅकेजेस बघण्यासाठी आलो. आमचा मुलगा लहान असल्यामुळे आम्ही देशांतर्गत हॉलिडे पॅकेजेस बघणार आहे.
- मंदार नाडगौडी, पर्यटक, पुणे

कमी वेळेत जास्त ठिकाणी जाण्यासाठी तसेच प्रवासातील धावपळीमुळे येणारा थकवा कमी व्हावा, यासाठी पर्यटक विमान प्रवासाला पसंती देत आहे. कार्निव्हलच्या निमित्ताने पर्यटकांना वेळेत डेस्टिनेशन निश्‍चित करता येते. पर्यायाने योग्य दरात विमानसेवा पुरविणे आम्हालाही शक्‍य होते.
- विजय लोखंडे, ट्रॅव्हलर्स टिकिटिंग अँड हॉलिडे

कुटुंब किंवा ग्रुपसाठी पर्यटनाचे विविध पर्याय कार्निव्हलमध्ये उपलब्ध आहे. सुनियोजित आणि योग्य दरातील पॅकेजेसमुळे विदेश पर्यटनाला पर्यटकांचा चांगला 
प्रतिसाद आहे.  
- शर्मिला खांडगे, निम हॉलिडे

पर्यटन, फोटोग्राफी आणि फूड एकाच ठिकाणी उपलब्ध असल्यामुळे पर्यटकांनी कार्निव्हलला गर्दी केली आहे. त्यांच्या पसंतीचे आणि सर्व गरजा पूर्ण करणारे किफायतशीर पॅकेज आम्हाला देणे शक्‍य होत आहे.
- संदीप देसाई, ट्रॅव्हलॉर हॉलिडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com