
पुणे - ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ तर्फे भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. फाउंडेशनचे हे ६६ वे वर्ष आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून एक लाख रुपयांची बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. त्याप्रमाणे भारतात पीएच.डी. करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या ५० पात्र भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.