संशोधन शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

पुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे - संशोधनपर कामासाठी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात दिल्या जाणाऱ्या ‘सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्ती’ आणि ‘ओक संशोधन पाठ्यवृत्ती’साठी इच्छुकांना अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोणत्याही क्षेत्रामध्ये संशोधन करणारे विद्यार्थी आणि शिक्षकांना दरवर्षी ‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ची शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, जैवतंत्रज्ञान व कुक्कुटपालन तसेच मायक्रोबायोलॉजी, मॉलेक्‍युलर बायोलॉजी, झूलॉजी, बॉटनी व बायोकेमिस्ट्री या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना ‘दामोदर माधव ओक’ व ‘सुधा दामोदर ओक’ यांच्या नावाने पाठ्यवृत्ती देण्यात येते. महाविद्यालये, विद्यापीठे किंवा तत्सम संशोधन संस्थांमध्ये संशोधन करणारे विद्यार्थी व शिक्षक यासाठी अर्ज करू शकतात, असे फाउंडेशनचे कार्यकारी सचिव डॉ. ए. एस. कालगावकर यांनी सांगितले.

संशोधन शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या संशोधकांना प्रत्येकी ४० हजार रुपये दोन समान हप्त्यामध्ये देण्यात येतील. शिष्यवृत्ती आणि पाठ्यवृत्तीच्या छापील अर्जांसाठी इच्छुकांनी पत्रासोबत दहा रुपयांचे टपाल तिकीट लावलेले व स्वतःचे नाव, पत्ता लिहिलेले पाकीट ‘कार्यकारी सचिव, सकाळ इंडिया फाउंडेशन, ५९५, बुधवार पेठे, पुणे-४११००२’ या पत्त्यावर येत्या ३१ जानेवारीपर्यंत पाठवावे. भरलेले अर्ज ९ फेब्रुवारी २०१९ पर्यंत स्वीकारण्यात येतील. अर्जाची छाननी व आवश्‍यकतेनुसार इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर शिष्यवृत्तीसाठी दोन आणि पाठ्यवृत्तीसाठी दोन संशोधकांची निवड करण्यात येईल. अधिक माहितीसाठी (०२०) २४४०५८९५, २४४०५८९७ या क्रमांकावर शासकीय सुट्टी व रविवार सोडून सकाळी १०ः३० ते दुपारी १२ः३० या वेळेत संपर्क साधावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal India Foundation Research Scholarship Form