Sakal Maha Conclave: महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशातील साखर कारखाने सुधारलेत; शरद पवारांकडून कौतुक

सकाळ माध्यम समुहानं पुण्यात बँकिंग व साखर उद्योगासाठी महाकॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे.
Sharad Pawar_Sakal Maha Enclave
Sharad Pawar_Sakal Maha Enclave

पुणे : सकाळ माध्यम समुहानं पुण्यात सहकारी बँकिंग व साखर उद्योगासाठी महाकॉन्क्लेव्हचं आयोजन केलं आहे. या दोन दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी शरद पवार यांनी आपले विचार मांडले. यावेळी त्यांनी साखर उद्योगात उत्तर प्रदेश चांगलं काम करत असल्याचं म्हटलं आहे. (Sakal Maha Conclave Sugar mills in Uttar Pradesh improved over Maharashtra says Sharad Pawar)

Sharad Pawar_Sakal Maha Enclave
Sharad Pawar on Fadnavis: "फडणवीसांचं महत्व वाढवायचं नाही"; पहाटेच्या शपथविधीवर अखेर पवार बोलले

शरद पवार म्हणाले, सहकारी साखर कारखान्यांमधून राज्य सहकारी संघ स्थापन केला, यामुळं एक मोठं व्यासपीठ मिळाले आहे. आत्तापर्यंत देशात ऊस आणि साखर याच्यापुढे आपण गेलो नाही पण आता जायचं असेल तर सहकारी संस्थांनी लक्ष दिलं पाहिजे.

Sharad Pawar_Sakal Maha Enclave
Sakal Maha Conclave: पवार अन् शहांच्या चर्चेतून सहकार क्षेत्राला दिशा मिळेल; प्रवीण दरेकरांना विश्वास

महाराष्ट्रात १,००० लाख टन ऊस गाळप केला जातो. सध्या २,४७० मेगावॅट विजेचे प्रकल्प सुरू झाले आहेत. राज्य सरकारला मी विजेचे दर कमी करण्याबाबत सांगतो आहे. केंद्र सरकारचं इथेनॉल संदर्भातील धोरण अतिशय चांगलं आहे. महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशातील काही कारखाने सुधारले आहेत. ऊसाचा दर्जा किती चांगला होईल यावर त्यांनी लक्ष दिलं आहे.

Sharad Pawar_Sakal Maha Enclave
Shinde Vs Thackeray: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, हा विषय प्रलंबित...

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा व्यवसाय मोठा झाला यामध्ये अनेकांचे आत्तापर्यंत कष्ट आहेत. आज राहणीमान, शिक्षणात अनेक बदल झाले आहेत असेच बदल साखर कारखान्यांमध्ये होणं गरजेचं आहे, असंही यावेळी पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com