esakal | होम क्वारंटाइन होऊन कंटाळा आलाय? तुम्हाला आहे बक्षीस जिंकण्याची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

AT-Home-With-Sakal

आपण पाहतोय की सध्या कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. आपल्या देशातही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घरात कंटाळले आहेत. त्यामुळे साहजिकंच घरी बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडलाय की घरात बसून नेमकं करावं तरी काय? पण डोन्ट वरी तुमच्या या सेल्फ क्वारंटाईन काळामध्ये सकाळ माध्यम समूह तुमच्यासोबत आहे..बरं आता विचार करत असाल सोबत म्हणजे नेमका कसा? तर हो आम्ही आता रोज तुमच्यासोबत असणार आहोत.

होम क्वारंटाइन होऊन कंटाळा आलाय? तुम्हाला आहे बक्षीस जिंकण्याची संधी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

विचार करा जर तुम्हाला या काळात घर बसल्या बक्षिसं मिळणार असं सांगितलं तर तुम्ही काय कराल? बरोबर अगदी तेच करायचं आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपण पाहतोय की सध्या कोरोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. आपल्या देशातही खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच घरात कंटाळले आहेत. त्यामुळे साहजिकंच घरी बसलेल्या प्रत्येकाला प्रश्न पडलाय की घरात बसून नेमकं करावं तरी काय? पण डोन्ट वरी तुमच्या या सेल्फ क्वारंटाईन काळामध्ये सकाळ माध्यम समूह तुमच्यासोबत आहे..बरं आता विचार करत असाल सोबत म्हणजे नेमका कसा? तर हो आम्ही आता रोज तुमच्यासोबत असणार आहोत.

विचार करा जर तुम्हाला या काळात, घर बसल्या बक्षिसं मिळणार असं सांगितलं तर, तुम्ही काय कराल? बरोबर अगदी तेच करायचं आहे. कारण आम्ही कुटुंबातल्या प्रत्येकाचा कंटाळा घालवण्यासाठी घेऊन आलो आहोत सकाळची अनोखी स्पर्धा ज्याचं नाव आहे. #AtHomeWithSakal..ज्यात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहेत आकर्षक बक्षिसं. चला तर मग एवढे दिवस ज्या सरप्राईजची वाट पाहत होतात ते आजमवण्यासाठी तयार आहात ना ? काय झालं नेमकं काय करायचं माहित नाही? तर मग पुढे वाचा-

सेल्फ क्वारंटाईमध्ये कोणाचीच घरातून सूटका नाही आहे..त्यामुळे सध्या घरात सगळ्याच वयोगटातील माणसं असतील...काय बरोबर ना? यासगळ्याचाच विचार करुन आम्ही स्पर्धेत सगळ्याच वयोगटातील माणसांना समाविष्ट करून घेणार आहोत. #AtHomeWithSakal या स्पर्धेत महिलांसाठी काय असणार?

महिला घरात टाकाऊपासून टिकाऊ असे एक ना अनेक प्रयोग करत असतात..त्यातंच महिलांची आवडती गोष्ट म्हणजे फॅशन. सध्या आपल्याकडे असलेल्या कपड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारची हटके फॅशन महिला करताना दिसतात. असंच काहीचं आता तुम्हाला देखील करायचं आहे...तर या स्पर्धेत महिलांसाठी असणार आहे ७ दिवसांचा फॅशन शो. यामध्ये रोजच्या थीमप्रमाणे ड्रेस घाला आणि कॅटवॉक करुन त्याचा व्हिडिओ बनवा..हा व्हिडिओ आम्हाला टॅग करा आणि #AtHomeWithSakal वापरुन शेअर करा. सलग सात दिवस महिलांना हा व्हिडिओ पाठवायचा आहे..यातुन एक विजेती निवडली जाईल तिला सकाळ माध्यम समुहाकडून मिळेल एक खास बक्षिस..

 #AtHomeWithSakal या स्पर्धेत पुरुषांसाठी काय असणार?
पुरुष आणि आरोग्य हे समीकरण जीम शिवाय पूर्ण होऊ शकतंच नाही...काही पुरुष त्यांच्या स्वास्थ्याकडे लक्ष देण्यासाठी न चुकता जीमला जातात तर काही पुरुषांना असतो जीमला जाण्याचा कंटाळा..त्यामुळे अशा दोन्ही गटांचा विचार करुन आम्ही घेऊन आलो आहोत सुर्यनमस्कार चॅलेंज..सध्या लॉकडाऊनमुळे जीम बंद असलेल्यांसाठी आणि जीमला जाण्याचा कंटाळा करणा-यांसाठी सूर्यनमस्कार हा स्वतःला फीट ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट मार्ग आहे...तर तुम्हाला यात १० सुर्यनमस्कार व्यवस्थित घालून याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे...हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या एका मित्राला टॅग करुन त्याला देखील हे चॅलेंज द्यायचं आहे..आणि आम्हाला टॅग करुन #AtHomeWithSakal वापरुन शेअर करायचा आहे..यातील विजेत्याला मिळणार आहे आकर्षक बक्षीस..

आता घरातील वडिलधारी मंडळी आम्ही दिलेले हे चॅलेंज करत असताना जर लहान मुलं डिस्टर्ब करत असतील तर अहो त्यांना पण कामाला लावा ना. 

#AtHomeWithSakal या स्पर्धेत बच्चेकंपनीसाठी काय असणार?
सध्याची लहानमुलं म्हणजे स्मार्ट किड्संच म्हणावी लागतील...त्यांचा हाच स्मार्टनेस तुम्हाला तुमच्या कॅमेरात कैद करायचा आहे..तर तुमच्या लहान मुलांचे कोणतेही कलागुण आता तुम्हाला जगासमोर मांडता येणारेत एका व्हिडिओच्या माध्यमातून...त्यांच्यातील कौशल्याचा एक व्हिडिओ तयार करा. हा व्हिडिओ आम्हाला टॅग करा आणि #AtHomeWithSakal वापरुन शेअर करा..आहे की नाही क्वारंटाईम काळात तुमच्या स्मार्ट मुलांना आणखी स्मार्ट व्हायची योग्य संधी ? लवकर सहभागी व्हा बक्षिसं वाट पाहत आहेत..

अजुन चॅलेंज संपले नाहीत मात्र सगळ्यांचे सगळे चॅलेंज करुन झाले असतील तर आता इकडे लक्ष द्या...लॉकडाऊनमध्ये एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल ती म्हणजे सगळं कुटूंब एकत्र वेळ घालवत आहे...सध्याच्या या धावपळीच्या जगात सणावारालासुद्धा एकत्र येणं अशक्य होतं..मात्र सध्या क्वारंटाईन झाल्यामुळे  सगळेच आपापल्या कुटूंबाला वेळ देत आहेत...आणि म्हणूनंच आम्ही तुमच्या कुटूंबासाठी देखील एक चॅलेंज घेऊन आलो आहोत...

#AtHomeWithSakal या स्पर्धेत परिवारासाठी काय असणार?
सगळेच एकत्र असणार आहात म्हटल्यावर अंताक्षरी तर खेळत असाल मात्र इथे तुम्हाला एकत्र येऊन गाणं बनवायचं आहे..तर संपूर्ण कुटूंबाने एकत्र येऊन एक गाणं बनवा आणि त्याच्या व्हिडिओ तयार करा..हा व्हिडिओ आम्हाला टॅग करा आणि #AtHomeWithSakal वापरुन शेअर करा..विजेत्यांना मिळणार आहेत आकर्षक बक्षिसं. यासगळ्या व्यतिरिक्त एक हटके चॅलेंज सकाळ माध्यम समूह तुमच्यासाठी घेऊन आलंय..

#AtHomeWithSakal या स्पर्धेतील काय आहे हुकस्टेप चॅलेंज?
सध्या सोशल मिडियाचा जमाना आहे..यात अनेक क्रिएटीव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात आणि तुम्ही ते फॉलो करत असतात...मात्र इथे तुम्हाला तुमची क्रिएटीव्हीटी दाखवण्याची संधी मिळत आहे...तर मग तयार आहात ना? यात सर्व कुटूंबियांनी मिळून किंवा वेगवेगळे एखाद्या आवडत्या गाण्याची हुकस्टेप करा आणि त्याचा व्हिडिओ बनवा..हा व्हिडिओ आम्हाला टॅग करा आणि #AtHomeWithSakal वापरुन शेअर करा..चला तर मग लवकरात लवकर सहभागी होऊन घरबसल्या बक्षिसांची लूट करा. काय मग पटलं ना कंटाळा आला असेल बसुन घरी पण सकाळ असताना व्हाय वरी? लवकरात लवकर सहभागी व्हा..

loading image