wan ifra award sakal media group
sakal
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ’ या मराठी दैनिकाला रंगीत छपाईसाठीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वॅन इफ्रा पुरस्कार’ ३४ व्या ‘इंडियन प्रिंटर समीट’मध्ये प्रदान करण्यात आला. ‘सकाळ’ समूहाच्या पुणे व कोल्हापूर आवृत्यांचा या निमित्ताने गौरव करण्यात आला. पुणे येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये ‘सकाळ’च्या प्रतिनिधींनी हा सन्मान स्वीकारला.