esakal | इंदापूर : 'सकाळ' माध्यम समूह हा समाजमनाचा आरसा - अंकिता शहा
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर : 'सकाळ' माध्यम समूह हा जनसमाजमनाचा आरसा

इंदापूर : 'सकाळ' माध्यम समूह हा समाजमनाचा आरसा - अंकिता शहा

sakal_logo
By
डाॅ. संदेश शहा

इंदापूर : 'सकाळ' माध्यम (sakal media) समूह हे केवळ वर्तमानपत्र नसून जनसमाज मनाचा आरसा आहे. या समूहाने शेती, आरोग्य, जलसंवर्धन, युवा पिढी, महिला आदीक्षेत्रात भरीव कार्यकरून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. वर्तमान पत्रात सुगरण सदरावर आधारित महिलांसाठी अभिनव स्पर्धेस उदंड प्रतिसाद मिळेल, असे प्रतिपादन इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा यांनी केले.

इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकरराव पाटील सभागृहात सुगरण स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इंदापूर लायनेस क्लबच्या अध्यक्षा सायरा आतार, कॅबिनेट ऑफिसर तथा इंदापूर तनिष्का जयश्री खबाले, कॅबिनेटऑफिसर तथा रेडा ग्रामपंचायतसदस्याराजश्री पवार, महिला दक्षता समिती सदस्या तथा महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सीमाकल्याणकर, सामाजीक कार्यकर्त्याविजयाकोकाटे,अफरोज मोमीन, कांदलगाव महिला बचत गटाच्या समन्वयक निलोफरपठाण,आयएमसीकंपनीच्या चेअरमन स्टार डॉ. राधिका शहा, सीमा अष्टेकर उपस्थित होत्या.

हेही वाचा: केंद्राच्या सुचनेवरुनच राणे कुटुंबियांविरोधात कारवाई - वळसे

यावेळी नगरसेविका राजश्री अशोक मखरे म्हणाल्या, युवती व महिलांसाठी सकाळने स्तुत्य उपक्रम राबविला असून त्यामुळे पाक कलेबरोबरच इतर ज्ञानात भर पडणार आहे.सकाळ बारामती उपविभागीय कार्यालयाचे वितरण प्रमुख मनोज काकडे म्हणाले, दि. १० सप्टेंबर ते ११ डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा चालणार असून प्रत्येकाला हमखास बक्षीस मिळणार आहे. यानिमित्त १ कोटीहूनअधिक किमतीची हजारो बक्षीसजिंकण्याचीसंधीअसून ९० पैकी ८० कुपन्स चिकटवून प्रवेशिका जवळच्या सकाळ कार्यालयात जमा करायची आहे. सुत्रसंचलन इंदापूर प्रतिनिधी डॉ. संदेश शहा तर आभार प्रदर्शन वितरक भीमा शंकरजाधव यांनी केले.

loading image
go to top