रोजा ठेवून मुस्लीम बांधवांकडून वारकऱ्यांची सेवा

अन्वर मोमिन
सोमवार, 19 जून 2017

खऱा तो एकची धर्म, जागाला प्रेम अर्पावे.. असे म्हणत येरवड्यातील मुस्लीम बांधवांनी दिवसभर वारकऱ्यांची व पोलिस बांधवांची सेवा करून मानवता धर्माचा अनोखा संदेश दिला. विशेष म्हणजे भर उन्हात थांबून वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या मुस्लीम बांधवांना रमजान महिन्याचे उपवास तर होतेच शिवाय काही मुस्लीम बांधव अपंग असूनही ते मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी झाले होते. 

वडगाव शेरी- खऱा तो एकची धर्म, जागाला प्रेम अर्पावे.. असे म्हणत येरवड्यातील मुस्लीम बांधवांनी दिवसभर वारकऱ्यांची व पोलिस बांधवांची सेवा करून मानवता धर्माचा अनोखा संदेश दिला. विशेष म्हणजे भर उन्हात थांबून वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या मुस्लीम बांधवांना रमजान महिन्याचे उपवास तर होतेच शिवाय काही मुस्लीम बांधव अपंग असूनही ते मोठ्या उत्साहात या उपक्रमात सहभागी झाले होते. 

 येथील अंजुमन तालीमुल कुरआनचे अध्यक्ष अली खान व प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे रफीक खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्तार शेक, गफ्फार शेख, रशीद शेख, साहिल खान, आफताब खान, राहुल कानडे, महेश मंडलीक आदी उपस्थित होते. यावेळी वारकऱ्यांना केळी, पाण्याचे वाटप करण्यात आले. याविषयी रफिक खान म्हणाले, कोणताही धर्म हा अंतिम मानव सेवेचा संदेश देतो, आम्ही दरवर्षी असा उपक्रम राबवतो, यावेळी उपवास करून अन्नदान केल्याने जास्त आनंद मिळाला हिच आपली संस्कृती आहे.

 

Web Title: sakal news pune news muslim roja Warkari unity