'सकाळ एनआयई' आंतरशालेय नाट्य स्पर्धेचा निकाल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

'सकाळ माध्यम समूहा'च्या "सकाळ एनआयई'व ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून पुणे विभागात अहिल्यादेवी हायस्कूल तर पिंपरी चिंचवड विभागात ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, जिल्हा विभागात श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूल यांनी यश संपादन केले आहे.

पुणे - 'सकाळ माध्यम समूहा'च्या "सकाळ एनआयई'व ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय नाट्य स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून पुणे विभागात अहिल्यादेवी हायस्कूल तर पिंपरी चिंचवड विभागात ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, जिल्हा विभागात श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूल यांनी यश संपादन केले आहे. सकाळ एनआयई च्या वतीने पुणे जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या अभिनय कौशल्याला वाव मिळावा, या हेतूने आंतरशालेय नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील शाळांनी "निसर्ग संकट , सोशल मिडिया व बदलती शिक्षण पद्धती ' या विषयावर आधारित दुष्काळ तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या नाटिका सादर केल्या. प्रा तुकाराम पाटील, प्रमोद आर्विकर, प्रकाश पारखी, अमोल कचरे यांनी परिक्षण केले.विजेत्या शाळांना स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निकाल सविस्तर खालील प्रमाणे
सविस्तर निकाल (विभाग व भाषानिहाय)
पुणे शहर (मराठी विभाग)

1)अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल ( साखळी)
2) मॉडर्न हायस्कूल (मुले) शिवाजीनगर (शेवटी मैदान बोलू लागले)
3) आर्यन्स वर्ल्डस स्कूल, भिलारेवाडी कात्रज (बे एके बे)
4)चंद्रकांत दरोडे प्राथमिक विद्यालय शिवाजीनगर (पर्यावरण हाच खरा नारायण)
5)चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर ( सोशल मिडियाचा वापर)

हिंदी विभाग
1)भारतीय विद्या भवन (प्राकृतिक विपदा)
2) अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल (जल है तो कल है)
3) रेणुका स्वरूप विद्यालय (आखिर कब तक)

उत्कृष्ट अभिनय -
1) राज ठकुरे (खंडू) मॉडर्न हायस्कूल, शिवाजीनगर
2) स्वराली उमराणी (रामबिहारी), अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल

उत्कृष्ट दिग्दर्शन -
विजयश्री महाडिक (साखळी)अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल
उत्कृष्ट लेखन - अव्दैता उमराणीकर (साखळी) अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल
उत्कृष्ट नेपथ्य - शेवटी मैदान बोलू लागले (मॉडर्न हायस्कूल)

पिंपरी चिंचवड (मराठी)
1) ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी (श..श. शाळा ,हशा हुशा)
2) सिटी प्राईड हायस्कूल (वुईच कलर डू यू वॉन्ट)
3) एच.ए.विद्यालय (आणि पृथ्वी बोलू लागली)
4) कन्या विद्यालय पिंपरी (हिरवा जागर एक झणझणीत अंजन)
5) शिक्षण प्रसारक मंडळी मराठी माध्यम प्राथमिक शाळा (मंत्र दिला शिवरायांनी)

पिंपरी चिंचवड (हिंदी विभाग)
1) सानेगुरूजी आदर्श विद्या निकेतन थेरगांव (सोशल मिडिया)
2) एस.पी.एम इंग्लिश स्कूल निगडी (चलो हवा आने दो पानी संघर्ष)
3) श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय (वीर शतमन्यू)
4) सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला चिंचवडगांव (पेडो कि पंचायत)

उत्कृष्ट अभिनय -
1) प्रणिती शिंदे (लसावि) - ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी
2) सर्वेश कट्टी (वेद)- सिटी प्राईड स्कूल)

उत्कृष्ट दिग्दर्शन -
एन.व्हि.कांबळे (सोशल मिडिया) सानेगुरूजी आदर्श विद्या निकेतन थेरगांव

उत्कृष्ट लेखन -
मीनल साकोरे (कन्या विद्यालय पिंपरी) हिरवा जागर एक झणझणीत अंजन
रंजना चौधरी (एस.पी.एम.हायस्कूल ) चला हवा आने दो पानी संघर्ष

उत्कृष्ट नेपथ्य -
सिटी प्राईड स्कूल (वुईच कलर डू यू वॉन्ट)

जिल्हा विभाग ( मराठी)
1) श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूल नारायणगांव (दोष कोणाचा ?)
2) एजंल हायस्कूल उरळी कांचन (आम्ही घडलो तुम्ही बिघडाना)

जिल्हा विभाग (हिंदी)
1) विद्या प्रतिष्ठान न्यू बालविकास विद्यालय पिंपळी बारामती (पृथ्वी का बुखार)
2)महात्मा गांधी विद्यालय, राजगुरूनगर (चलो पढे आगे बढे)
3)जनता विद्या मंदिर, घोडेगाव (हाय रे सोशल मिडिया)

उत्कृष्ट अभिनय -
1)निरंजन कानडे (मॉन्टी) - श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूल नारायणगांव
2) आकांक्षा नरवडे (सई)- जनता विद्या मंदिर घोडेगांव, ता.आंबेगाव जि.पुणे

उत्कृष्ट दिग्दर्शन -
सरला शितोळे (व्हेन नेचर स्पिक्‍स) जनता विद्या मंदिर, घोडेगांव
उत्कृष्ट नेपथ्य - व्हेन नेचर स्पिक्‍स ,जनता विद्या मंदिर, घोडेगाव

इंग्रजी विभाग
1) जनता विद्या मंदिर घोडेगांव ता.आंबेगाव (व्हेन नेचर स्पिक्‍स)
2) मॉडर्न हायस्कूल निगडी (सायबर ऍडिक्‍शन)
3) एस.पी.एम हायस्कूल यमुनानगर निगडी (सोशल मिडिया बेन ऑर बून)
4) सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला चिंचवड (वेक अप बिफोर इटस टू लेट)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Nie Interschool Drama Competition Result