

'Amrutanubhav': A Tribute to Saints
Sakal
पुणे : ‘मनाचें जें चंचळपण। तें आवरुनि करावें ध्यान।।’ अशा शब्दांत ध्यानाचे महत्त्व समजवणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज; तर ‘आहे तैसा चि बरा। परि नाही नाही ते करा।।’, अशा शब्दांत समाधानाची महती सांगणारे जगद्गुरू तुकाराम महाराज. संतांनी आपल्या साहित्यातून जीवनातील अनेक पैलूंवर मौलिक भाष्य केले आहे. या शिकवणीचा ‘अमृतानुभव’ घेण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.