

Suhana Swasthyam 2025
Sakal
पुणे : जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारा स्वास्थ्यजागर अर्थात ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवाची शुक्रवारपासून (ता. ५) नांदी होत आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे समाजाच्या समग्र कल्याणाच्या उद्देशातून आयोजित या आगळ्यावेगळ्या महोत्सवाला सलग चौथ्या वर्षी पुणेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. यंदा हा महोत्सव अधिक व्यापक झाला असून, सलग तीन दिवस पुण्यात विविध ठिकाणी या महोत्सवातील दर्जेदार कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे.