
पुणे - ‘पियू बोले’, ‘बाँवरा मन’, ‘खोया खोया चाँद’, ‘ओ री चिरैया’, ‘बहती हवा सा था वो’, ‘बंदे में था दम’, ‘रुबाइयां’ यासारख्या एकापेक्षा एक भावस्पर्शी आणि सुरेल गीतांची पर्वणी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे, प्रतिभावंत कवी, गीतकार, संगीतकार, पार्श्वगायक आणि अभिनेते स्वानंद किरकिरे यांच्या ‘बाँवरा’ या नव्याकोऱ्या मैफिलीचे.