निवृत्तीनंतरचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या आरामदायी होण्यासाठी जीवनशैलीनुसार किती खर्च येतो याचा अंदाज घेऊन तरतूद करायला हवी. त्यासाठी गुंतवणूक जितकी लवकर सुरू करू, तेवढी रक्कम कमी लागेल. त्यामुळे लवकर नियोजन करा. शेअर बाजारातील गुंतवणूक या संपत्तीनिर्मितीसाठी एक उत्तम मार्ग आहे, असा सल्ला मार्सेलस इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सचे संस्थापक सौरभ मुखर्जीया यांनी दिला.