अवघड वाटेवर यशस्वीपणे चालणाऱ्या तीन लढवय्यांचे अनुभव कथन ऐकण्याची संधी ८ डिसेंबर रोजी ‘स्वास्थम्’मध्ये मिळणार आहे. वंचित आणि त्यात ‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांच्या जीवनात आशेची ‘पालवी’ फुटण्यासाठी झटणाऱ्या प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या डॉ. मंगल शहा, गेल्या ४५ वर्षांपासून बालविवाह आणि मुलींच्या समान हक्कांसाठी लढा देणारे ‘इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट, पाचोड’ या संस्थेचे डॉ. अशोक दयालचंद आणि ३८ वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या मागास, वंचित आणि शाळाबाह्य मुलांचे भविष्य घडविणाऱ्या एकलव्य बाल शिक्षण संस्थेच्या प्रमुख रेणू गावसकर यांची वाटचाल समजून घेण्याची संधी मिळणार आहे. ‘स्वास्थ्यम्’च्या निमित्ताने गणाधीश प्रभुदेसाई यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.