झोपेत समतोल असावा. झोप त्रासदायक, तर अतिझोप हानिकारक ठरते. अन्न, पाणी व प्राणवायूच्या जोडीला पुरेशी झोपही आवश्यक असते, असे प्रतिपादन बालनिद्रा सल्लागार अँजेलिना गुप्ता आणि मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. सुजित जगताप यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात ‘निद्रा- विश्रांतीचे महत्त्व- शांत निद्रा आणि आरोग्य’ यांचा परस्परसंबंध या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.